Tuesday 3 July 2018

Dear पाऊस

Dear पाऊस
धो धो बरसण्याची
तुला भारी हौस...

यायच्या आधी एखादा
Miss call तरी दे
रेनकोट छत्र्या आम्हाला
Ready ठेऊ दे....

जाऊ आम्ही पायी
घरी ठेऊन गाडी
ज्यांना भिजायचंय ते
तयार होतील गडी.. 

येणार असशील धाडकन
तर call करत जा पटकन
आडोशाला कुठेतरी
दडु आम्ही चटकन.....

संध्याकाळच्या वेळी मात्र
थोडा शांत बसत जा
घर आमचं वाट पाहतंय
जरा ध्यानात ठेवत जा

No comments:

Post a Comment