Wednesday 28 May 2014

नाही कळले कधी तुला
भाव हे अंतरीचे
हे सारे बहाणे तुझे
कि भास माझ्या मनीचे........

Saturday 24 May 2014

आयुष्यात सुखदुखांशी झगडताना
म्हातारपण कधी जवळ येतं कळतही नाही ……
अन तारुण्यातल्या गुजगोष्टी आठवल्याशिवाय
सुरकुतलेल्या गालावरची कळी देखील खुलत नाही …… 

Friday 23 May 2014

मन हे वेडे तुझ्यात गुंतलेले
कालही आजही उद्यहि….

फुलपाखरागत उडुनी गेले सारे क्षण ते
तरीही आठवणीने तुझ्या वेढलेले
कालही आजही उद्यहि…।

कळले न कधी दिस ते गेले
तुझ्या मिठीचे केवळ भास हे उरले
तरीही वाटेवर तुझ्या नजर हि वळे
कालही आजही उद्यहि……. 

Thursday 22 May 2014

फुलांमध्ये कळ्यां मध्ये दिसते आई
दुखात सतत हसते आई ……

जेव्हा जेव्हा पाहते मी अंगणातली सावली
माझ्या आईची वाजते बांगडी

ममतेची मूर्ती क्रोधाची माता
समुद्रापेक्षाही वेगाने वाहतात तिच्या ममतेच्या लाटा ….

जन्म देऊन केलेत उपकार
जीवनात भरलेत सुसंस्कार ……

फुलांमध्ये कळ्यां मध्ये दिसते आई
दुखात सतत हसते आई ……





शब्द तुझे माझे 
मुके होऊन गेले …। 
तुला पाहताच सख्या 
तुझी होऊन गेले……। 
प्रेम…….   आयुष्य  एका
बंधनात  बांधून ठेवते ……
मैत्री …….  मन मोकळे करून
आयुष्य जगायला शिकवते ………. 
जाऊन जाऊन माझ्यापासून
कितीशी दूर जाशील
मला विसरता विसरता
पुन्हा माझ्याच आठवणीत रमशील