आपल्या परक्याचे गणित आता मी जुळवत नाही माझ्या मनीची घालमेल आता मी कळवत नाही..... काहींचे चोचले बघितले काहींचे चोचले पुरवले माझी आवड जपताना मात्र सारेच कसे हरवले...... आल्या-गेल्याचं गुपित आता मी लोळवत नाही कोण काय बोलेल या भीतीने स्वतःला पोळत नाही......