Tuesday, 28 November 2017

आपल्या परक्याचे गणित
आता मी जुळवत नाही
माझ्या मनीची घालमेल
आता मी कळवत नाही.....

काहींचे चोचले बघितले
काहींचे चोचले पुरवले
माझी आवड जपताना
मात्र सारेच कसे हरवले......

आल्या-गेल्याचं गुपित
आता मी लोळवत नाही
कोण काय बोलेल या भीतीने
स्वतःला पोळत नाही......

Monday, 29 February 2016

तुझ्या माझ्यातलं अंतर कसं नकळत पुसत गेलं
नजरेला नजर भिडता भिडता
सगळच कसं जुळत गेलं

कळलंच नाही कधी मन तुझ्यात गुंतत गेलं
तुझ्या हलक्या स्पर्शाने
अख्खं जग बदलून गेलं

हलकसं माझ घाबरण लाजण सारच तुझ्यात विरत गेलं
नजरेला नजर भिडता भिडता
सगळच कसं जुळत गेलं 

Tuesday, 30 June 2015

TUZA SPARSH....

तेव्हाचा तुझा हलका स्पर्श
असा स्पर्शुनी गेला
जणू चांदण्यांचा धुंद गारवा.........
ना कळले तुला कधी
ना कळले मला..........
सखे, तुजसवे हा श्वास हि नवा.........

जयश्री पालेकर - तानवडे