Friday, 31 October 2014

ओठांवर आलेले शब्द ....
पुन्हा परतून गेले .......
तुझं सुख पाहून
मन हलकेच हसून गेले ......

तिच्या सोबत आहेस तू
याचे दुख कधीच नव्हते......
पण मी तुझी नाही म्हणून
ओठांवर आलेले शब्द
पुन्हा परतून गेले .......

फक्त एकदाच तुला सांगावे
इतकेच स्वप्न मनी होते......
पण तुझ्या नकाराची भीती वाटली
अन ओठांवर आलेले शब्द
पुन्हा परतून गेले .......

Tuesday, 30 September 2014

तू सोबत नव्हतास
पण तुझी आठवण सोबत होती
तुझ्या सोबत जगण्याची आस
मनी होती.....

तुझ्या सुखासाठी.... तुला हवे तसे
सगळे काही करण्यासाठी
मनानेही कात टाकली होती ......

तुझ्या नकळत तुला पाहण्यासाठी
माझ्या पापण्यांचीहि
धडपड चालू होती .......

कधी न कधी नक्की कळेल तुला .....
कुणीतरी तुझ्यासाठी
क्षणोक्षणी झुरत होती .....

Wednesday, 20 August 2014

जगता जगता..... अजूनही
जगायचेच राहून गेले
मागे वळून पहिले तर......
तुला विसरायचेच राहून गेले..........

डोळ्यांना लाख समजावले
तरीही........... ओघळणारे असू मात्र.....
साठवायचेच राहून गेले...........

Tuesday, 22 July 2014

आयुष्य म्हणजे ……. 
तुझ्या सोबत जगलेला प्रत्येक क्षण 


Tuesday, 17 June 2014

तुझ्या येण्याची चाहूल लागताच
मन कसे सैरभैर होऊन जाते.......
रिमझिमत्या श्रावण सरित तुझी आठवण
माझ्या प्रेमाचे रंग उधळून जाते............

Tuesday, 10 June 2014

आयुष्य समजून घेता घेता
आयुष्यच संपून जात.........
पुढे जाता जाता
मागून मग आठवणींच
वार वाहू लागतं..........

Wednesday, 28 May 2014

नाही कळले कधी तुला
भाव हे अंतरीचे
हे सारे बहाणे तुझे
कि भास माझ्या मनीचे........