Wednesday, 20 August 2014

जगता जगता..... अजूनही
जगायचेच राहून गेले
मागे वळून पहिले तर......
तुला विसरायचेच राहून गेले..........

डोळ्यांना लाख समजावले
तरीही........... ओघळणारे असू मात्र.....
साठवायचेच राहून गेले...........

Tuesday, 22 July 2014

आयुष्य म्हणजे ……. 
तुझ्या सोबत जगलेला प्रत्येक क्षण 


Tuesday, 17 June 2014

तुझ्या येण्याची चाहूल लागताच
मन कसे सैरभैर होऊन जाते.......
रिमझिमत्या श्रावण सरित तुझी आठवण
माझ्या प्रेमाचे रंग उधळून जाते............

Tuesday, 10 June 2014

आयुष्य समजून घेता घेता
आयुष्यच संपून जात.........
पुढे जाता जाता
मागून मग आठवणींच
वार वाहू लागतं..........

Wednesday, 28 May 2014

नाही कळले कधी तुला
भाव हे अंतरीचे
हे सारे बहाणे तुझे
कि भास माझ्या मनीचे........

Saturday, 24 May 2014

आयुष्यात सुखदुखांशी झगडताना
म्हातारपण कधी जवळ येतं कळतही नाही ……
अन तारुण्यातल्या गुजगोष्टी आठवल्याशिवाय
सुरकुतलेल्या गालावरची कळी देखील खुलत नाही …… 

Friday, 23 May 2014

मन हे वेडे तुझ्यात गुंतलेले
कालही आजही उद्यहि….

फुलपाखरागत उडुनी गेले सारे क्षण ते
तरीही आठवणीने तुझ्या वेढलेले
कालही आजही उद्यहि…।

कळले न कधी दिस ते गेले
तुझ्या मिठीचे केवळ भास हे उरले
तरीही वाटेवर तुझ्या नजर हि वळे
कालही आजही उद्यहि…….