Monday, 11 June 2018
Wednesday, 6 June 2018
कशाला हवा वारस
कशाला हवा वारस
कशाला हवा मुलगा
जरी झाली मुलगी
तुमच्या आयुष्याला देईल
ती ही अर्थ नवा
बाबा बाबा करत... साऱ्या तक्रारी
Share करेल
बेटा म्हणुन बोलवताना
तुम्हालाही अभिमान वाटेल
तिच्यासाठी मुलगा बघताना
तुमची जी धांदल उडेल
खरंच सांगते तेव्हा तुम्हाला
वेगळाच आनंद मिळेल
सासरी पाठवणी करताना
तिचं बालपण पुन्हा रडवेल
मुलीचा बाप म्हणुन जगलेलं सुख
तेव्हाच तुम्हा उमजेल
तुझं रूप
समुद्राच्या लाटांनाही लाजवेल
असं तुझं हसु खळखळणारं
फुलांनाही हरवेल असा
तुझा गंध दरवळणारा
निसर्गालाही लाजवेल असं
तुझं रूप बहरत जाणारं
वाऱ्यालाही लाजवेल असा
तुझा स्पर्श हवाहवासा वाटणारा
हरवुन जातो मी
पाहून रूप तुझे....
अन तुला वाटे
हा तर माझा एक बहाणा -
तुला पाहण्याचा, तुला भेटण्याचा..
असं तुझं हसु खळखळणारं
फुलांनाही हरवेल असा
तुझा गंध दरवळणारा
निसर्गालाही लाजवेल असं
तुझं रूप बहरत जाणारं
वाऱ्यालाही लाजवेल असा
तुझा स्पर्श हवाहवासा वाटणारा
हरवुन जातो मी
पाहून रूप तुझे....
अन तुला वाटे
हा तर माझा एक बहाणा -
तुला पाहण्याचा, तुला भेटण्याचा..
Thursday, 31 May 2018
Pratilipi
प्रतिलिपि वर मला अनुसरण करा :
https://marathi.pratilipi.com/user/t820128bj5?utm_source=android&utm_campaign=myprofile_share
अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा
Wednesday, 30 May 2018
have a nice day
सकाळी सकाळी तुझी आठवण
हळूच कानाजवळ येते
हलकेच फुंकर मारून
have a nice day म्हणते
आरशासमोर उभारल्यावर
तुझेच प्रतिबिंब दिसते
अलगद मिठीत येऊन ते हि
have a nice day म्हणते
स्पर्शून येते हवा तुला
माझ्या भोवती मग भिरभिरते
काहूर माजतो मनात अन ती
have a nice day म्हणते
स्वप्न आहे कि भास हा माझा
जे मी तुझ्यासाठी जगते
आता मी हि येता जाता मलाच
have a nice day म्हणते
हळूच कानाजवळ येते
हलकेच फुंकर मारून
have a nice day म्हणते
आरशासमोर उभारल्यावर
तुझेच प्रतिबिंब दिसते
अलगद मिठीत येऊन ते हि
have a nice day म्हणते
स्पर्शून येते हवा तुला
माझ्या भोवती मग भिरभिरते
काहूर माजतो मनात अन ती
have a nice day म्हणते
स्वप्न आहे कि भास हा माझा
जे मी तुझ्यासाठी जगते
आता मी हि येता जाता मलाच
have a nice day म्हणते
Tuesday, 29 May 2018
Subscribe to:
Posts (Atom)




