Friday, 25 May 2018

chatting


लोकांनी दिलेलं ज्ञान
अन स्वतःला असलेलं KNOWLEDGE 
याचा समतोल साधणं
खूप कठीण असतं......

Tuesday, 28 November 2017

आपल्या परक्याचे गणित
आता मी जुळवत नाही
माझ्या मनीची घालमेल
आता मी कळवत नाही.....

काहींचे चोचले बघितले
काहींचे चोचले पुरवले
माझी आवड जपताना
मात्र सारेच कसे हरवले......

आल्या-गेल्याचं गुपित
आता मी लोळवत नाही
कोण काय बोलेल या भीतीने
स्वतःला पोळत नाही......